बीड जिल्हा अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी घेतलेला धाडसी निर्णय एक पोलिस खात्यातील आदर्श ठरणार.
बीड जिल्हा प्रतिनिधी :- पोलिस अधीक्षक यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदन व्यक्त केले
बीड शहरातील अहमदनगर रोडवर असलेल्या कालिका नगर येथे दोन गटांत तलवारी व गोळ्या चालवून तुंबळ हाणामारी झाली असता,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी दोन्ही ही गटाच्या फिर्यादी न घेता, पोलिस फिर्यादी करून, दोन्ही ही गटाला आरोपी ठरविण्याची भूमिका घेऊन निश्चितच आदर्श व कौतुकास्पद कामगिरी केली.
अशी भांडण करणारे गट पुढे चालून आपसात मांडवली करून घेऊन, शहराची कायदा सुव्यवस्था तर बिघडतेच परंतु जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस प्रशासनावर जास्तीचा तान येतो व बहुमूल्य वेळ सुद्धा वाया जातो,
असा दुरदृष्टीने विचार करून ठाकूर साहेबांनी या प्रकरणात स्वतः पोलिसांना फिर्यादी केले,या भूमिकेमुळे बीड शहरच नाही तर जिल्हाभरात आता पोलीस प्रशासनाच्या कार्याला वेगळीच उंची मिळाली आहे.याबद्दल ठाकूर साहेबांचे कौतुक व अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.असे माध्यमांशी बोलताना अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना बीड जिल्हा अध्यक्ष श्री एस एम युसुफ यांनी सांगितले,व पुढे युसुफ यांनी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांना बिड येथे बोलवून, श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ही सांगितले.

0 टिप्पण्या