रोजगार सेवक संघटनेच्या पालम तालुका अध्यक्षपदी राजधर भोसले

रोजगार सेवक संघटनेच्या पालम तालुका अध्यक्षपदी राजधर भोसले

पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- ग्रामरोजगार सेवक संघटनेची पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठक आयोजित केली असता,पेठ पिंपळगाव येथील ग्रामरोजगार सेवक श्री राजधर भोसले यांच्या कार्य कुशलता,कार्यालयीन संबंध व मनमिळावू स्वभावामुळे सर्वानूमते  निवड करण्यात आली,
श्री राजधर भोसले यांची पालम तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली असता,
राजधर भोसले यांनी अध्यक्ष पद स्वीकारले व इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली,उपाध्यक्षपदी कराळे प्रभाकर रामराव,सचिव सुरणर रामेश्वर शिवाजी,सहसचिव बचाटे सुरेश दिगंबर,कोषाध्यक्षपदी गोपाळ गंगाधर खंदारे,संघटक पदी जाधव चंद्रकांत दतराव,यांची निवड करण्यात आली असता, गटविकास अधिकारी श्री शिसोदे साहेब यांनी, नव निर्वाचित अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी पालम तालुक्यातील सर्व ग्राम रोजगारसेवक सेवक व पंचायत समिती विभागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या