आळंदी ते पंढरपूर पाई दिंडी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र फळा येथून दिंडी क्रमांक ४९ रवाना.

आळंदी ते पंढरपूर पाई दिंडी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र फळा येथून दिंडी क्रमांक ४९ रवाना.

पालम तालुका प्रतिनिधी :- श्री क्षेत्र फळा ते आळंदी पाई दिंडी क्रमांक ४९, दि.7 जून 2023. वार बुधवार  दुपारी 3 वाजता श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा येथून दिंडी क्र 49 श्री क्षेत्र आळंदी कडे रवाना,
श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपेने चार मोठ्या ड्रक,एक मोठाऐचर टेंपो, दोन मोठे पाणी टॅंकर,आणि एक फिल्टर पाण्याचा छोटा टेंपो, असे एकुण वाहणे वहाने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी, महाराजांच्या आशीर्वादाने वारीत आहेत.
चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, या संतांच्या उक्तीप्रमाणे,पालम पुर्णा, गंगाखेड तसेच बऱ्याच खेड्यापाड्याचे भाविक भक्त दिंडी मध्ये सहभागी झाले असून,हा एक महीन्याचा आळंदी ते पंढरपूर पाई सोहळा करणे, जन्माला आल्याच सार्थक झाल्याचे समाधान मिळते.असे माध्यमांशी बोलताना दिंडीचे व्यवस्थापक यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या