मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत अनेक नवीन आजारांचा समावेश;गरजूवंतांनी लाभ घ्यावा - एस.एम.युसूफ़

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत अनेक नवीन आजारांचा समावेश;गरजूवंतांनी लाभ घ्यावा - एस.एम.युसूफ़ 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत अनेक नवीन आजारांचा समावेश करण्यात आला असून गरजूवंतांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. 
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यात विहित नमुन्यातील अर्ज. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.). तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे). रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे). संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चडड रिपोर्ट आवश्यक. प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री :८६५०५६७५६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कौकलियर इम्प्लॉट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मैरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांचे शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, अपघात, कर्करोग (केमोथेरपी), नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रूग्ण, विद्युत अपघात रुग्ण या आजारांचा समावेश करण्यात आलेला असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून संबंधित रुग्ण या Email ID: aao.cmrf-mh@gov.in वेबसाईटवर आपली माहिती पाठवून लाभ घेऊ शकतात किंवा भ्रमणध्वनी क्र.९६१९९५१५१५ किंवा दुरध्वनी क्र.०२२-२२०२५५४० वर संपर्क साधू शकतात अशी माहिती मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली असून गरजूवंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या