पवनचक्की वाल्याची दादागिरी रोडची बुजवली सर्व चारी
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- मौजे घाटनांदुर तालुका भूम येथील गावातील तलावात येणारे पाणी,पवन चक्की वाल्यांनी चारी बुजून शेतकऱ्याच्या रानामध्ये सोडून दिल्याने,शेतीमध्ये पाणी साचून चिखल झाला आहे,त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याने,शेतकऱ्यांनी वारंवार आधिकाऱ्याशी संपर्क केला असता, चक्क दादागिरीची भाषा करून,चारी काढून दिले जात नाही,जा काय करायचं ते करा अशा धमक्या देतात,
पवन चक्की कंपनीने जमिन संपादित न करता, दंडेलशाहीने रोडचे रुंदीकरण करून, दुतर्फी चाऱ्या बुजवल्याने,गाव तलावात जमा न होता, पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडून दिले आहे,
सदर प्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ नाल्यांची पुनर्बाधणी करून द्यावी, पावसाळा सुरू झाला आहे,पेरणीचे दिवस आले असून,चिखलामुळे मशागत करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.असे शेतकरी अनंता लवटे, भीमराव लवटे,अंबादास लवटे,दत्तात्रय लवटे,गौतम पवार,रवींद्र हुंबे इत्यादी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

0 टिप्पण्या