आदित्य गोपाळ कच्छवे यांचे ८०.६० % टक्के गुण घेऊन घवघवीत यश.शुभेच्छेचा वर्षाव.

आदित्य गोपाळ कच्छवे यांचे ८०.६० % टक्के गुण घेऊन घवघवीत यश.शुभेच्छेचा वर्षाव.

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- सध्या राज्य भरात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे,

दैठणा तालुका जिल्हा परभणी येथील, सामान्य शेतकरी श्री गोपाळ कच्छवे यांचे सुपुत्र आदित्य गोपाळ कच्छवे या मुलाने, सामान्य कुटुंबातील अडीअडचणीला न जुमानता,आई वडिलांना, हातभार लावत, क्लासेस न लावता, मिळेल त्या वेळेस अभ्यास करून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणा येथे दहवीला ८०.६० % टक्के गुण घेऊन, घवघवीत यश मिळविले, याबद्दल नातेवाईक,इष्टमित्र व परिसरातून शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.

आई वडील भाऊ आजोबा व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे, मिळालेल्या यशाचे खरे श्रेय,शिक्षक व आई वडील यांचं असल्याचे, आदित्य गोपाळ कच्छवेने माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या