एकेकाळी हॉकीपटू असणारा खेळाडू आज भयावह संकटात, 82 वयाच्या खेळाडूंना शासनाने काय देल.
बीड जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय टीमने १९६१ साली हॉलंडवर विजय मिळवला, त्या वेळेस याच खेळाडूंने भारतीय हॉकी संघाचा इतिहास घडवला होता, तेच टेकचंद टीमचे सुत्रधार होते,ज्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला,त्याच खेळाडूंची आज किती बिकट परिस्थिती आहे, शासनाने अशा खेळाडूंना मानधन देऊन, त्यांना आधार देन गरजेचे आहे,
जो टेकचंद टीमचे मुख्य खेळाडू होते,त्यांची आज इतकी दयनीय अवस्था झाली आहे, त्या काळातील हॉकी चे जादूगर मेजर ध्यानचंदचे शिष्य आणि मोहरसिंह सारख्या खेळाडूंचे गुरू आज एका पडक्या झडक्या झोपड़ी मध्ये जीवन कंठीत आहेत ही देशासाठी शरमेची बाब आहे, लोकप्रतिनिधि पासून ते लेकर सरकार पर्यंत ज्यांना आदराने व मानाने वागणूक दिली पाहिजे, पण आपले नेते, आपल्या वैयक्तिक मोठेपणा व हारतुरे घेण्यात मग्न आहेत, त्यांना काय टेकचंद दिसणार, हॉकी खेळ हा देशाचा राष्ट्रीय खेळ असूनही, हॉकी खेळाडूला ६०० रूपये प्रतिमहा पेन्शन देऊन जणू उपकार करित असल्याचे दिसून येते आहे
मध्यप्रदेश मध्ये सागर येथे राहणारे टेकचंदला पत्नी व मुले नहींत,खाण्या पिण्यासाठी भावाच्या कुटूंबावर अधारीत राहावे लागते, त्यामुळे कधीकधी उपाशीपोटी ही रहावे लागते,अशा नामवंत खेळाडूंची ज्या देशात ही अवस्था झाली,त्याच देशात लोकप्रतिनिधी एकवेळ निवडून येतात आणि अनेक पिढ्या त्यांच्या पेन्शनवर आरामात बसून जीवनसुखाने जगतात, पण ज्याने देशाचे नाव लौकीक केले तो मात्र उपाशीपोटी राहतात,वा रे भगवान तेरी लिला.

0 टिप्पण्या