विशाखा विष्णू निळेला ७४.१७ % टक्के मार्क घेऊन घवघवीत यश.शुभेच्छेचा वर्षाव.

विशाखा विष्णू निळेला ७४.१७ % टक्के मार्क घेऊन घवघवीत यश.शुभेच्छेचा वर्षाव.
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी :- सध्या राज्य भरात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे,
महाराष्ट्रात पुन्हा मुलींनीच यशस्वी मार्गाने मुसंडी मारलेली दिसते.

 
चोथेवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील, सामान्य शेतकरी श्री विष्णू माणिकराव निळे व सौ पद्मीनबाई विष्णू निळे,यांची कन्या विशाखा विष्णू निळे या मुलीने, सामान्य कुटुंबातील अडीअडचणीला न जुमानता,आई वडिलांना, हातभार लावत, क्लासेस न लावता, मिळेल त्या वेळेस अभ्यास करून, शंकर माध्यमिक विद्यालय बारानांदूर या शाळेतून बाराविला
  ७४.१७ % टक्के मार्क घेऊन, घवघवीत यश मिळविले, याबद्दल नातेवाईक,इष्टमित्र व परिसरातून शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.

आई वडील भाऊ आजोबा व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे, मिळालेल्या यशाचे खरे श्रेय,शिक्षक व आई वडील यांचं असल्याचे, विशाखा विष्णू निळे हिने माध्यमांशी बोलताना सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या