ताडकळस येथे प्रसाद पौळ यांचा केक कापून केला वाढदिवस साजरा...!

ताडकळस येथे प्रसाद पौळ यांचा केक कापून वाढदिवस साजरा...!

 
ताडकळस प्रतिनिधी :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथिल अक्षदा कंप्युटर येथे रूरल एक्सप्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांचा केक कापून व हार घालून सन्मानपूर्वक वाढदिवस साजरा करण्यात आला. 
यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुढील आयुष्य भरभाटीचे जावे यासाठी मंगल कामणा करण्यात आली. तसेच प्रगतिशील शेतकरी जनार्दन आवरगंड याच्या कडून आंबे देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपालजी हानवते, ग्रामपंचायत सदस्य संग्राम खंदारे, पञकार गजानन नाईकवाडे, दिपक कानडे, शमीम पठाण अदीची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्धन आवरगंड यांनी केले तर आभारप्रदर्शन गजानन नाईकवाडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या