माणूसकीची जाणीव, मन्सूर काशिम पठाण यांनी वाचवले तिनं जीव पडेगाव येथील घटना.
गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे तीन लहान मुले पाण्यात बुडत असतांना त्यांना वाचवण्यासाठी सोबत असणाऱ्या आईने, मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात गेली पण, पाण्याचा अचूक अंदाज नसल्याने मुलांसोबत आई पाण्यात बुडू लागली, तितक्यात मन्सूर पठाण हे पडेगाव येथे बाधकाम करण्यासाठी जात असताना,आई व मूले पाण्यात बुडत असल्याचे पाहून, क्षणाचाही विलंब न लावता, मन्सूर पठाण यांनी पळत जाऊन त्या तीन मुलांना आणि त्यांच्या आईला सुखरूप बाहेर काडले,
जा को राखे साईयां उसे मार सकेना कोय, या उक्तीप्रमाणे,आई व मुलं खूप काही प्रयत्न करत होते पण,पाणी पाच ते सात फूट खोल असल्याने अचूक अंदाज नसल्याने ही घटना घडली. पण मन्सूर पठाण यांनी सर्वांना सुखरूप बाहेर काडण्यात यश आले,
या धाडसी कार्याबद्दल पडेगाव येथील ग्रामस्थांनी मन्सूर पठाण यांचे मनापासून आभार मानले,व आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याची मदत केल्याने मन्सूर काशिम पठाण यांनी माणूसकीची जाणीव करून एक आदर्श निर्माण केला, मन्सूर काशिम पठाण यांच्या या कार्याबद्दल मन्सूर पठाण यांचे सर्वत्र कौतुक करून शुभेच्छा देत आहेत.

0 टिप्पण्या