पालमला व्हॉइस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
पालम :- शहरातील तहसील कार्यायासमोर व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम शाखेकडून धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, त्यांनी पालम तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींचे प्रश्न सोडवले जात नाहीत. हे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी तहसीलसमोर पत्रकारांनी धरणे धरले. त्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी, वृत्तपत्रांच्या जाहिरातीवर जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी शासकीय भूखंड देण्यात यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा द्यावा, त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, आधी मागण्याचा समावेश निवेदनात आहे. निवेदनावर संघटनेचे पालन तालुकाध्यक्ष शांतीलाल शर्मा, जिल्हा संघटक भास्कर लांडे, उपाध्यक्ष माधव हनवते, धोंडीराम कळंबे, कार्याध्यक्ष गुणवंत सराफ, सरचिटणीस मोतीराम शिंदे, सहसरचिटणीस गोविंद सोलेवाड, कोषाध्यक्ष बाबासाहेब फुलपगार, कार्यवाहक अंकुश वाघमारे, संघटक अंबादास ठाकूर, सहसंघटक बाबासाहेब एंगडे, प्रसिद्धी प्रमुख राहूल गायकवाड, मार्गदर्शक माधवराव गायकवाड, मारूती नाईकवाडे, लक्ष्मण दुधाटे, वैजनाथ हत्तीअंबीरे, सदस्य भगवान करंजे, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी शिंदे, संग्राम खेडकर, चाँद तांबोळी, राम बनसोडे, शरद पोले, प्रसाद पौळ, रूखमाजी गिनगिने, गजानन जाधव, बळीराम येवले, केरबा बहीरवाड, तुकाराम रानगीरे, संभाजी शिराळे, शादूल सत्तार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या