रमाई घरकुल योजनेच्या कामात अडथळा, लाभधारकाचा उपोषणाचा इशारा,चिंचोली ता.तुळजापूर जि.धाराशिव येथील घटना.
तुळजापूर प्चिंरतिनिधी :- चिंचोली ता. तुळजापूर येथील घर नं. ३९० मधील रमाई घरकुल योजनेमधून मिळालेल्या घरकुलाचे काम चालू असून त्यामध्ये १)अजमिर मदार सय्यद यांनी ग्रामपंचायतच्या वाटेवर अतिक्रमण केले आहे, तरी ते वाट अतिक्रमण काढून द्यावे २)गुलाब मंदार सय्यद यांनी गावालगत जमीन आहे व गावठाणालगत असल्या कारणाने माझी बाथरूम खड्डा त्याच्या शेत जमीनीमध्ये आहे असे म्हणून माझे घरकूल अडवून दादागिरी करत आहेत,
ग्रामपंचायत चिंचोली यांनी दर्शविलेल्या गवाठणाप्रमाणे व त्यांनी दिलेल्या ८ अ नुसार लाभधारक बांधकाम करीत आहे, तरी मला योग्य तो न्याय द्यावा व तसेच संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन समज द्यावी. अन्यथा आम्ही कुटुंबासह आमरण उपोषण बसणार आहोत. अशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना निवेदन देऊन देखील काहीच कारवाई झालेली नाही अशी माहिती अण्णासाहेब जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

0 टिप्पण्या