परभणी जिल्ह्यात कलम ३६ लागू ,जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी दिली प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

परभणी जिल्ह्यात कलम ३६ लागू ,जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी दिली प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

परभणी जिल्हा प्रतिनिधी :-दि. 29  जिल्ह्यात एप्रिल महिन्यात श्रीरामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी गुरुवार दि. ३० मार्च ते शनिवार, दि. १५ एप्रिल २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलिस कायदा कलम क्रमांक 36 लागू राहणार आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  
 
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलीस अधिनियम कलम 36 मध्ये पोटकलम क, ख, ग, ड 1 (ड क) व (च) प्रमाणे हे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी हे आदेश लागू केले आहेत. कलम 36 मुंबई पोलिस कायद्यान्वये प्राप्त अधिकारानुसार परंतु, कलम 33 अन्वये केलेल्या कोणत्याही नियम वा आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या