अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने,जागतिक महिला दिन साक्री पो.स्टे येथील महिला कर्मचारी वर्गाला वस्तू भेट देऊन साजरा,
साक्री तालुका प्रतिनिधी :- अध्यक्ष श्री निवास .बी.ईदुरीकर सरांच्या आदेशानुसार 8 मार्च रोजी महिला जागतिक दिनानिमित्त साक्री पोलिस स्टेशन येथील महिला कर्मचारी वर्गचा अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट वस्तू देऊन सत्कार केला
तसेच PSI सरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.पीएसआय साहेबांनी, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना म्हणजे पोलिस खात्याचा, समाजाशी सलोखा व अडीअडचणी दूर करण्यासाठीचा दुवा असून, पोलिस कर्मचारी वर्गाला मिळालेला सहकार्याचा हात आहे,
असे मत व्यक्त केले व कार्यक्रमाचे कौतुक केले,अखिल भारतीय पोलिस हक्क संघटने विषयी PSI सरांना खुप अभिमान वाटला. सर्व पदाधिकारी हजर राहील्याने कार्यक्रम खुप सुंदर पद्धतीने पार पडला,साक्री तालुका अध्यक्ष मयुरी बोरसे,साक्री शहर अध्यक्ष ललिता देवरे,राज्य महिला उपाध्यक्ष वंदना खैरनार,व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थीतीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

0 टिप्पण्या