बिड जिल्ह्यातील विडा गावची अजबच परंपरा, धुळवडीच्या दिवशी जावायाची गाढवावरून मिरवणूक.
बिड जिल्हा प्रतिनिधी :- बिड जिल्ह्यातील विडा गावच्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार जावयाचा धुळवडीच्या दिवशी अगळा वेगळा मानसन्मान, भारतीय संस्कृतीत जावयाला मानसन्मान देण्याची आपली संस्कृती आहे.
मात्र या दिवशी बीड जिल्ह्यातील विडा गावात जावयाला चक्क गाढवावर बसवलं जातं आणि गावभर मिरवलं जातं. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. परंतु या अजब सन्मान सोहळ्यातून सुटका व्हावी म्हणून बरेच जावाई पसार होतात,
पण गावकऱ्यांनी या विषयावर तोडगा काढला,धुलिवंदनाच्या दोन दिवस आधी जावई शोध समितीचे कार्यकर्ते व गावकरी जावई शोध मोहीम हाती घेतात.बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात नेमलेले पथक जावई शोधून आणतात व धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.काही जावई आता स्वखुशीने ही या मानसन्मानासाठी तयार होतात,

0 टिप्पण्या