नरळद ते चंद्रपूर पायी वारी निमित्त सर्व भाविक भक्तांना आव्हान.
गंगाखेड प्रतिनिधी :- नरळद ते चंद्रपूर पायी वारी सोहळा, श्री संत देवयमाय यांच्या संकल्पनेतून गुडी पाडव्याच्या व वर्षारंभाच्या मुहूर्तावर साकारलेल्या या सोहळ्याला, गोंधळी,भूते, पोतराज, देवकर व इतर सर्व भाविक भक्तांना, सध्याचे देवस्थानचे देवकर तथा हभप.श्री तुळशीराम महाराज यांनी दिनांक22/03/2023 रोज बुधवारी,देवयमाय देवस्थान नरळद इरळद येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे,
अनेक वर्षांपासून दर वर्षी,गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर,माता देवयमाय यांनी, नरळद ते चंद्रपूर पायी वारी चालू केली आहे,देवयमायी नंतर हभप श्री संत नरहरी महाराज देवकर यांनी हा नेम पालन केला,त्याच चालू केलेल्या रिती रिवाजाप्रमाणे सध्याचे देवकर तथा हभप श्री तुकाराम महाराज यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे.त्या अनुषंगाने सर्व, भूते, गोंधळी, पोतराज, देवकर व इतर भाविक भक्तांना नरळद इरळद येथे उपस्थित रहावे व माता देवयमाय यांच्या नेमाला पुढे चालू ठेवून, चंद्रपूर रहीवाशी धुरपतमायीचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी जाऊया,
तरी सर्व स्तरातील भाविक भक्तांनी दिनांक 22/03/2023 बुधवार रोजी नरळद इरळद येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

0 टिप्पण्या