अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी, श्री दिपक गज्जेवार यांची निवड व नियुक्ती.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- पोलिस कर्मचारी व महिला कर्मचारी यांच्या हक्कासाठी,शासन दरबारी सडेतोड प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असणाऱ्या, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना, संस्थापक अध्यक्ष माननिय श्री श्रीनिवास इंदुरकर यांनी,श्री दिपक बालाजी गज्जेवार यांच्या समाज कार्य व संघटनात्मक वैचारिकता या सर्व गोष्टींची दखल घेऊन, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करुन, नियुक्ती पत्र प्रदान केले,व पुढील कार्यास शुभेच्छा देऊन, अभिनंदन केले.
नांदेड जिल्हा अध्यक्ष पदाचे सुत्र हाती घेऊन, श्री दिपक गज्जेवार यांनी, संघटनेच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत, पदाधिकाऱ्यांच्या निवडी व नियुक्त्या करून, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना वाढीसाठी तनमनधनाने कार्य करील, असे आवाहन केले.
श्री दिपक बालाजी गज्जेवार यांची नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे,

0 टिप्पण्या