परभणी जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय पोलीस हक संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. श्रीनिवास इंदुरकर यांच्या सूचनेनुसार, श्री शेषराव सोपणे मामा महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दिलीप माने संपादक दैनिक आजचा लोकप्रश्न तथा जेष्ठ पत्रकार, यांच्या हस्ते श्री प्रसाद पौळ, संपादक रूरल एक्स्प्रेस यांना,अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख म्हणून दैनिक आजचा लोकप्रश्न कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आहे.यावेळी श्री रमाकांत कुलकर्णी अण्णा जेष्ठ पत्रकार, श्री मोहनभाई, इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
देशातील सर्व स्तरावरील पोलीस महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व आवश्यक तेथे संघटनेच्या माध्यमातून समाजहित चळवळ उभी करण्यासाठी, ही निवड करण्यात आली असुन या नियुक्तीचे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव मा. श्री संतोष कुरुडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख मा. श्री शेषराव मोहणाजी सोपणे, महिला राज्य अध्यक्षा मा. सौ. तनुजा गुळवी, महिला राज्य उपाध्यक्षा मा. सौ. वंदना खैरनार, राज्य महिला सचिव सौ. रजणी मराठे व इतर अनेक मान्यवरानी त्यांच्या या निवडीचे शुभेच्छा देऊन स्वागत केले आहे.
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतीक क्षेत्रात सतत अग्रेसर मितभाषी कुशल संघटक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे, श्री प्रसाद सखाहरी पौळ संपादक रूरल एक्स्प्रेस, यांची ओळख आहे.
महाराष्ट्र व स्नेहीजनासाठी ही निवड अभिमास्पद बाब आहे, श्री प्रसाद पौळ आपल्या कर्तव्यतत्परतेने कुशल संघटक गुणवत्ता व्दारे समस्याचे निराकरण करून न्याय व हक्क मिळवून देत आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेशी आदर्शवत कामगिरी करूण लौकिकता प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचे नाव सर्वदूर करतील व नियुक्ती बद्दलचा संघटनेचा विश्वास सार्थ ठरवतील अशी आशा सामाजिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या