पालम येथील मध्यवर्ती बँकेत रोज एक कायदा, खातेदारांची मात्र उडते त्रेधा,
पालम तालुका प्रतिनिधी :- आज होळी पोरनिमेच्या दिवशी,पीएम किसान अनुदान लाभधारकांना,इड्राल देण्यासाठी,लाईन लाऊन खातेदारांची मध्यवर्ती सहकारी बँक पालम शाखेच्या कर्मचारी व शाखा अधिकारी यांनी पाचावर धारण केली,वयवृध्द लोक उभे करून जनू त्यांना,पीएम किसान अनुदान लाभधारक शेतकरी असल्याची शिक्षा झाली का काय असे लाईन मधील खातेदारांची चर्चा दबक्या आवाजात ऐकू येत आहे.
पालम येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या अनागोंदी निर्णयावर सर्व खातेदार उद्वीग्न झाले आहेत.कर्मचारी मात्र सरळ सरळ खातेदारांची गैरसोय होत असताना, घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवून आहेत.यामुळे धड काम ना कानवला अशी परिस्थिती या बॅंकेच्या रोज एक कायदा या निर्णयामुळे होत आहे.

0 टिप्पण्या