लातूर जिल्हा प्रतिनिधी :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १० मार्च २०२३ रोजी मंदार, हरंगुळ बु येथे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या प्रेरणेतून शिवजयंती समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या शुभहस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी हरंगुळ चे माजी सरपंच तथा लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात स्वतः पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी रक्तदान करून तरुणांचा उत्साह वाढवला. तसेच याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी योगेश पिसदूरकर, विनोद कातळे, मन्मथ धुमाळ, राम जाधव यांनीही रक्तदान केले. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या रक्तदानामुळे युवकांना एक नवी दिशा मिळाली. यामुळे या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले.
याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक गोरख दिवे म्हणाले की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने विधायक कार्य झाले पाहिजे. तसेच रक्तदानासारखे पवित्र कार्य आपण केले पाहिजे. जयंती म्हणजे नुसते डीजे लावून नाचणे नव्हे, तर महापुरुषांच्या विचाराचा खऱ्या अर्थाने जागरण गोंधळ केला पाहिजे. असे मौलिक विचार मांडून युवकांना एक दिशा देण्याचे काम गोरख दिवे यांनी केले आहे.
याप्रसंगी हरंगुळ चे माजी सरपंच तथा लोकाधिकार प्रमुख यांनी पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या या सामाजिक बांधिलकी बांधून करत असलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. चांगल्या विचाराचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याकडून समाजाला एक दिशा देण्याचे कार्य घडते. यापुढे मंदार हरंगुळ (बु.) येथील प्रत्येक शिवजयंतीला रक्तदान शिबिर घेऊनच मिरवणूक काढण्याची प्रथा पोलीस निरीक्षक गोरख दिवे साहेब यांच्यामुळे आज पासून निर्माण झाल्याचे व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमास हरंगुळ चे माजी सरपंच डॉ. राम गजधने, निवृत्ती तिगिले, श्याम बरूरे, संतोष पनाळे, संभाजी गोरे, सागर खंडापुरे, मल्हारी मजगे, अर्जुन बरुरे, सुशील तिगीले, बशीर अलमले, गणेश चामे, करण आयलाने, शिवाजी शिंदे, शुभम तिगीले, प्रशांत चामे, प्रशांत खरोसे, सतीश बंडगर, नवनाथ शेळके, प्रशांत दासरे, अभिजीत कैले, मनोज जटाळ, सागर कैले, दीपक माळगे, प्रदीप माळगे, गुरु चक्रे, उमेश सिद्धेश्वरे, वैभव तिघिले, कृष्णा बंडगर, उद्धव पनाळे, करण शेळके, विकी पाटील, धीरज चामे, प्रेमसागर खंदाडे, वैभव उडगे, जहिद कबाडे, बालाजी पनाळे, सुरज पनाळे, होमगार्ड सुनील केशवे, महेंद्र सरवदे तसेच शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ब्रिजेश बाचपल्ले, आदीपरिचारक बी डी सूर्यवंशी, समाजसेवा अधीक्षक सिद्धेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या