लायन्स क्लब लातूर सेंट्रल संचलित सद्गुरु माऊली डायबेटिस केअर सेंटर द्वारा आयोजित फुल बॉडी चेकअप शिबिराचे लायन्सचे पूर्व प्रांतपाल डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

लायन्स क्लब लातूर सेंट्रल संचलित सद्गुरु माऊली डायबेटिस केअर सेंटर द्वारा आयोजित फुल बॉडी चेकअप शिबिराचे लायन्सचे पूर्व प्रांतपाल डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
 
लातूर जिल्हा प्रतिनिधी :- लायन्स क्लब लातूर सेंट्रल संचलित सद्गुरु माऊली डायबेटिस केअर सेंटर द्वारा आयोजित फुल बॉडी चेकअप शिबिराचा शुभारंभ दिनांक ५ मार्च २०२३ वार रविवार रोजी करण्यात आला. 
 या शिबिराचे उद्घाटन लायन्सचे पूर्व प्रांतपाल डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. शिबिराचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर निखिल दरक होते.  
प्रारंभी लायन्सचे पूर्व प्रांतपाल डॉक्टर गोपाळराव पाटील, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर निखिल दरक, तसेच लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे या मान्यवरांचा लायन्स क्लब लातूर सेंट्रल च्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 
लायन्स क्लब लातूर सेंट्रल चे अध्यक्ष लायन प्रसाद हंचाटे, सचिव लॉयन रवींद्र आसोपा, कोषाध्यक्ष लॉयन राजेश खंडेलवाल, पी आर ओ लायन अक्षय डावरे, पास्ट प्रेसिडेंट लॉयन राजेश पत्रिके, पास्ट प्रेसिडेंट लॉयन चंद्रशेखर धमगुंडे, प्रकल्प प्रमुख लॉयन डॉक्टर श्यामसुंदर सोनी, प्रकल्प उपप्रमुख लॉयन भरत हंचाटे व क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.  
क्लबचे आधारस्तंभ ज्येष्ठ पत्रकार, लोकाधिकारप्रमुख तथा लोकाधिकार वार्ता चे संपादक व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती आदरणीय लॉयन्स चे पूर्व प्रांतपाल डॉक्टर गोपाळराव पाटील यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर निखिल दरक यांना क्लबचे पूर्व प्रेसिडेंट लायन राजेश पत्रिके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या