रोजेदारांना धूळ-फुफूटायुक्त खाद्यपदार्थांपासून वाचवा

रोजेदारांना धूळ-फुफूटायुक्त खाद्यपदार्थांपासून वाचवा 

डीसीसी बँक ते बलभीम चौक रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजवा 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील डीसीसी बँक ते बलभीम चौक रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजवून रोजेदारांना धूळ-फुफूटायुक्त खाद्यपदार्थांपासून वाचवावे अशी मागणी जिल्हाधिकारी, प्रशासक आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून डाॅ. शेख एजाज़ आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.           
           याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील बशीरगंज भागात असलेल्या डीसीसी बँकेपासून ते बलभीम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे अगणित खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांना त्रास तर होतोच आहे. शिवाय दिनांक २४ मार्च २०२३ शुक्रवारपासून इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. या संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव बहुसंख्येने रोजे धरतात. भल्या पहाटेपासून ते दिवस मावळेपर्यंत अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब प्राशन न करता जवळपास १५ तासांचे रोजेदार दररोज संध्याकाळी रोजा सोडण्यासाठी महिनाभर फळफळावड सह अनेक खाद्यपदार्थ घेऊन जातात. यातील अनेक खाद्यपदार्थ हे रमजानच्या संपूर्ण महिनाभर अनेक विक्रेते डीसीसी बँकेपासून ते बलभीम चौक पर्यंतच्या रस्त्यावर तयार करतात. रस्त्यावरच ठेवतात आणि रस्त्यावरच ठेवून विकतात. मात्र या रस्त्यावर पडलेल्या अगणित खड्ड्यांमुळे येथे प्रचंड धुरळा व फुफुटा उडत असून तो विक्रीसाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांवर बसतो आणि तेच धुळ-फुफूटायुक्त खाद्यपदार्थ रोजेदारांना रोजा सोडताना नाविलाजाने खावे लागते. यामुळे रोजेदारांच्या आरोग्य विषयक समस्या डोके वर काढतात आणि  रोजेदार आजारी पडतात. ही बाब लक्षात घेता डीसीसी बँकेपासून ते बलभीम चौक पर्यंत रस्त्यावरील खड्डे युद्धपातळीवर विशेष मोहीम हाती घेऊन येत्या १-२ दिवसात डांबरीकरणाने बुजविले जावे. अशी मागणी डॉ. शेख एजाज़ आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, प्रशासक आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या