अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा गुणगौरव व सत्कार.

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा गुणगौरव व सत्कार.
शिंदखेडा प्रतिनिधी :- येथील पोलीस स्टेशन येथे अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथील संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम राबविण्यात आला 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सह पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी भूषविले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले, प्रतिमापूजन संघटनेचे शोभाताई पाटील व महिला पोलीस कर्मचारी सुनीता परदेशी यांच्या सह उपस्थित सर्व महिलांनी केले.
प्रसंगी उपस्थित महिला पोलीस कर्मचारी सुनिता परदेशी, माधुरी चव्हाण ,रजनी पाटील ,महिला होमगार्ड कमल परदेशी,अंजनाबाई वारुडे ,अंजना परदेशी, लता परदेशी यांचा संघटनेच्या महिला पदाधिकारींद्वारे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे, तालुका अध्यक्ष जितेंद्र राजपूत, तालुका उपाध्यक्ष हेमंत चित्ते , तालुका सचिव ज्ञानेश्वर माळी,कोषाध्यक्ष योगेश गोसावी, सह कोषाध्यक्ष मुकेश वाघ,तालुका संपर्कप्रमुख भूषण पवार तसेच संघटनेचे महिला पदाधिकारी शोभाताई पाटील ,रीतांजली गिरासे, रीना वाघ उपस्थित होते प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे म्हणाले की आजच्या युगातील महिला घराची जबाबदारी सांभाळून सोबतच पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून आपले योगदान देत आहे आपल्या महिला पोलीस कर्मचारी भगिनींची कामगिरी उल्लेखनीय आहे त्यांच्या या कार्याला सलाम करत त्यांना आमच्या संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन व भविष्यात असेच उल्लेखनीय कामगिरी करत राहोत अशा शुभेच्छा दिल्या तर महिला पोलीस कर्मचारी सुनीता परदेशी व रजनी पाटील यांनी मनोगतातून गुणगौरव व सत्कार केल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास पीएसआय मिलिंद पवार, ए एस आय रफिक मुल्ला, हेड कॉन्स्टेबल एक लाख पठाण, ए बी पवार, अशोक धनगर , भामरे, पोलीस कॉन्स्टेबल चौधरी, शिंदे होमगार्ड मनोहर भदाणे किरण पाटोळे,सुदाम साळुंखे, गोपाल पवार ,दिलीप खैरनार,जगदीश पाटील, दिनेश गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनवणे यांनी केले तर आभार सह पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस हक्क संरक्षण संघटना शिंदखेडा यांच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या