प्रामाणिक पत्रकारितेचा पद्मपाणी प्रतिष्ठानकडून मानाने सन्मान

प्रामाणिक पत्रकारितेचा  पद्मपाणी प्रतिष्ठानकडून  मानाने सन्मान 
एस.एम.युसूफ़ यांना पत्रकाराच्या पारंपारिक वेशभूषेची हृदयी भेट 

बीड जिल्हा प्रतिनिधी :- पद्मपाणि प्रतिष्ठानकडून घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा पत्रकारांची पारंपरिक वेशभूषा भेट देऊन मानाने सन्मान करण्यात आला.
सत्कार प्रसंगी बोलताना पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप तरकसे सर म्हणाले की, जवळपास गेल्या दहा वर्षांपासून एस.एम.युसूफ़ हे पत्रकारितेच्या क्षेत्रात मुक्त संचार करत आहेत. कुणाकडून कधी एक रुपयाची अपेक्षा करत नाहीत, की कधी कुणाला चहा पाजा म्हणत नाहीत. मात्र पत्रकारिता करताना चांगल्या ला चांगले व वाईटाला वाईट लिहिण्यास कचरत नाहीत. त्यांच्या स्पष्ट, परखड व सडेतोड लिखाणामुळे बीड शहरात अनेक कामे झाल्याचे व होत असल्याचे आपण सर्वजण पाहतच आहोत. अशा या मनस्वी पत्रकाराला पद्मपाणि प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठान तर्फे पत्रकाराची ओळख असलेली वेशभूषा म्हणजेच पांढरा नेहरू शर्ट, पायजमा, कोल्हापुरी चप्पल, शाल व पुष्पगुच्छ देऊन हृदयी सन्मान करीत आहे. त्यांनी यापुढेही आपली पत्रकारिता अशीच सर्वसामान्यांसाठी, तळागाळातील लोकांसाठी, न्यायासाठी सातत्याने सुरूच ठेवावी अशी याप्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो असे म्हटले.
          यावेळी व्यासपीठावर विजयराजजी बंब, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत उर्फ सुरेश साबळे, तहसीलदार सुहास हजारे, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नानाभाऊ हजारे, नागपूर चे सुप्रसिद्ध उद्योजक रत्नदीप कांबळे, अंजूमन इशाअत ए तालीम शिक्षण संस्थेच्या सचिव खान सबीहा बेगम, उद्योजक तथा खटोड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम भाऊ खटोड, संस्थाचालक विक्रम मुंडे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक लोढा, प्राचार्य दादासाहेब खोले, इंजि. नवनाथ पोटभरे, पञकार वैभव स्वामी, एस.के.बोराडे, ऑड. अनिल सुतार, सेवानिवृत्त प्राचार्य हौसराव पवार, मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ, ध्येयपूर्ती गुरुकुलचे इंगळे सर, आदर्श तरकसे, प्रा. राजकुमार वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या