शिक्षक भरतीत धनगर समाजाच्या उमेदवारांना हक्काच्या आरक्षणाप्रमाणे संधी द्यावी.या मागणीसाठी निवेदन सादर.
गंगाखेड प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने होऊ घातलेल्या आगामी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये धनगर समाजाच्या उमेदवारांची साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे भरती करावी या मागणीसाठी,गंगाखेड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पवित्र पोर्टल मार्फत आगामी काळात तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. आज पर्यंत झालेल्या वेगवेगळ्या भरतीमध्ये धनगर समाजाच्या उमेदवारांना साडेतीन टक्के प्रमाणे संधी मिळत नाही. उलट धनगर समाजाच्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दाखवून त्यांना डावलण्यात येते. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी व आगामी नोकर भरती प्रक्रियेमध्ये धनगर समाजाचे उमेदवार हे साडेतीन टक्केच्या हक्काच्या आरक्षणा प्रमाणे घेतली जावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री सखाराम बोबडे पडेगावकर,गोविंद नारायणराव काळे,हनुमान बोबडे,योगिनंद मरगळ, अशोक आळसे,बळीराम भूसणर, अनंत बोबडे,संजय जाधव,वैभव डाके, राहुल पारवे,विक्रमबाबा इमडे,बीटी साळवे,ज्ञानेश्वर शंबुले आदींची उपस्थिती होती

0 टिप्पण्या