अखिल भारतीय पोलीस हक संरक्षक संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष पदीश्री. धिरेंद्र लेखराज सिंग यांची नियुक्ती.

अखिल भारतीय पोलीस हक संरक्षक संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष पदी
श्री. धिरेंद्र  लेखराज सिंग यांची नियुक्ती.
 
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :- अखिल भारतीय पोलीस हक संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. श्रीनिवास इंदुरकर यांच्या सूचनेनुसार  दत्तप्रसाद सा. आंबिलवादे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या हस्ते श्री. धिरेंद्र  लेखराज सिंग 
 यांना  अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना छत्रपती संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
     देशातील सर्व स्तरावरील पोलीस महिला व पुरुष कर्मचार्यांचा योग्य सन्मान व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व आवश्यक तेथे संघटनेच्या माध्यमातून समाजहित चळवळ उभी करण्यासाठी ही निवड करण्यात आली असुन या नियुक्तीचे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव मा. श्री संतोष कुरुडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख मा. श्री मोहणाजी सोपणे, महिला राज्य अध्यक्षा मा. सौ. तनुजा गुळवी, महिला राज्य उपाध्यक्षा मा. सौ. वंदना खैरनार, राज्य महिला सचिव सौ. रजणी मराठे व इतर अनेक मान्यवरानी त्यांच्या या निवडीचे शुभेच्छा देऊन स्वागत केले आहे.
      सामाजिक, धार्मिक, सांस्कृतीक क्षेत्रात सतत अग्रेसर मितभाषी कुशल संघटक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व धिरेंद्र लेखराज सिंग  (लाला ) यांची ओळख आहे.
  महाराष्ट्र व स्नेहीजनासाठी ही निवड अभिमास्पद बाब आहे , धिरेंद्र सींग लाला आपल्या कर्तव्यतत्परतेने कुशल संघटक गुणवत्ता व्दारे  समस्याचे निराकरण करून न्याय व हक्क  मिळवून देत आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेशी आदर्शवत कामगिरी करूण लौकिकता प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचे  नाव सर्वदूर करतील व नियुक्ती बद्दलचा संघटनेचा विश्वास सार्थ ठरवतील अशी आशा सामाजिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या