हळू बोला, कोणी ऐकेल, प्रश्न हेडमास्तरचा आहे? जिल्हा परिषद प्रा.शाळा कावळेवाडीच्या मुख्याध्यापकांने केला शालेय पोषण आहाराचा घपळा.

हळू बोला, कोणी ऐकेल, प्रश्न हेडमास्तरचा आहे? जिल्हा परिषद प्रा.शाळा कावळेवाडीच्या मुख्याध्यापकांने केला शालेय पोषण आहाराचा घपळा.

 
शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांऐवजी मुख्याध्यापक आणि ठेकेदारांच्या फायद्याची ठरली,११ क्विंटल तांदूळ केले संगनमताने लंपास जि.प.प्रा.शा.कावळेवाडी शाळेतील गोष्ट.

परळी प्रतिनिधी :- विद्यार्थी यांची उपस्थिती वाढावी व शिक्षणाची गोडी लागावी म्हणुन केंद्र व राज्य सरकारकडून  देशभरात शालेय पोषण आहार ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.परंतु दस्तूरखूद्द शाळांकडून या योजनेत अपहार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.असाच प्रकार परळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावळेवाडी केंद्र नागप्रिंपीत घडला असुन मुख्याध्यापक चंद्रशेखर मस्के यांनी २२ कट्टे तांदळाचा घपला केल्याचे उघडकीस आले आहे.
साई मार्केटिंग अॅन्ड ट्रेडिंग (बीड) या कंपनीच्या बीड जिल्हा पुरवठादार कार्यालयाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र नागप्रिंपी शाळेला दिनांक २० मार्च २०२३ रोजी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तांदळाचे १८ कट्टे,सहावी ते आठवीसाठी तांदळाचे १३ कट्टे,५० किलो मीठ,५० किलो हरभरा आदी धान्याचा कागदोपत्री पुरवठा करण्यात आला आहे. तसेच मुख्याध्यापक चंद्रशेखर मस्के यांच्या सही व शिक्यानिशी तशी पोहोचही घेण्यात आली होती.
मात्र दिनांक २० मार्च २०२३ रोजी येथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी पुरवठा करण्यात आलेल्या धान्याची पाहणी केली असता प्रत्यक्षात २२ कट्टे तांदळाचे कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा प्रकरण उघडकीस आला यापुर्वीही या शाळेत दोन/तीन वेळा पोषण आहारात अपहार होत असल्याची  कुणकुण होती.परंतु पुराव्या अभावी हा काळाबाजार ठेकेदार व मुख्याध्यापकांकडुन बिनदिक्कत सुरु होता.त्यामुळे असा भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्याध्यापक, ठेकेदारावर योग्य ते कार्यवाही करुन साई ट्रेडिंग कंपनीच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे आणि मुख्याध्यापक चंद्रशेखर मस्के यांची तात्काळ बदली करण्याची मागणी येथील नागरिक,शिक्षक करत आहे.

केंद्र व राज्य सरकारची ही अत्यंत  महत्वाकांक्षी धोरणात्मक योजना आहे. तथापि योजनेच्या अंमलबजावणीकडे जिल्हापरिषद,पंचायत समिती,व शिक्षण विभागाकडुन कमालीचा कानाडोळा असल्याने गैरप्रकार करणाऱ्या संबंधितांचे फावले असल्याचे बोलले जाते.
मुख्याध्यापक किंवा नेमुन दिलेल्या शिक्षक हा धान्यादी व्यवस्थेवर लक्ष ठेवीत असतो मात्र निगरानी दाखल ठेवलेले शिक्षकच झारीतल्या शुक्राचाया प्रमाणे विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावुन घेत असल्याने अशा मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या