पालम तालुका प्रतिनिधी :- पंचायत समिती पालम अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत भालकुडकी येथे,गाव अंतर्गत नरेगा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन, जिल्हा परिषद नरेगा डीओ माननिय श्री गाडे साहेब यांच्या उपस्थितीत, पालम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री रामोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले,
यावेळी गाडे साहेबांनी ग्रामपंचायत स्तरावरील नरेगा कामा विषयी, नियम व अटी समजून सांगितल्या,तर गटविकास अधिकारी श्री रामोड साहेब यांनी जास्तीत जास्त लोकांना नरेगाच्या कामाचा लाभ कसा मिळेल या साठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न करावा असे आवाहन केले,
यावेळी जिल्हा परिषदेचे नरेगा डीओ मा.श्री गाडे साहेब,पंचायत समिती पालमचे मा.गट विकास अधिकारी श्री रामोड साहेब,तसेच ग्रामविस्तार अधिकारी गायकवाड सर, ग्रामसेवक हिंगे सर,एपीओ अनिल तिगोटे, तांत्रिक साहाय्यक सुधाकर बहीर सर, ग्रामरोजगार सेवक पैके मामा,सरपंच ब्याळे व सर्व गावकरी उपस्थित होते.

0 टिप्पण्या