जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक व्यापारी जनजागृती अभियान व ग्राहक कल्याण परिषद सदस्यांचे सत्कार
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक व्यापारी जनजागृती अभियान व ग्राहक कल्याण परिषद सदस्यांचे सत्कार हा कार्यक्रम राष्ट्रजन फाउंडेशन परभणी तर्फे करण्यात आला.
सत्कारमूर्ती अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे मराठवाडा सचिव शिवलिंग आप्पा खापरे, तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद परभणी शहर उपाध्यक्षपदी मंगेश भरकड पाटील यांची निवड झाल्याबद्दल भगवी टोपी हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक जनसेवक रितेश जैन , प्रमुख पाहुणे समाजसेवक जीवन आप्पा तरवडगे, कार्यक्रमाचे संयोजक प्राणी मित्र ग्राहक सेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष ) त्यांच्या वतीने दिनांक 15 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता बालाजी सेल्स येथे सत्कार व ग्राहक दिन साजरा करण्यात आला जागो ग्राहक जागो

0 टिप्पण्या