पालकांना खबरदारीचे आवाहन, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास द्याल तर होणार शिक्षा व दंडात्मक कारवाई,

पालकांना खबरदारीचे आवाहन, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास द्याल तर होणार शिक्षा व दंडात्मक कारवाई,
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- सध्याच्या धावपळीच्या युगात,वाहानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रहदारीचे प्रमाण वाढले आहे,अल्पवयीन मुलांच्या बेसावधपणे सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवल्याने आपघाताचे प्रमाण वाढले आहे,
 अल्पवयीन मुलांकडुन सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवणेचे प्रकार वाढत चालले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. 
कायद्यानुसार अठरा वर्षा खालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे, पालकांनी मुलांना वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये,अशा प्रकारचे प्रबोधन गेले दोन महिने,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील अधिकारी वेगवगळ्या शाळा व महाविदयालया मध्ये जाऊन करीत आहेत.
 तथापि सदर प्रकारामध्ये घट झाल्याचे दिसुन येत नाहीं. त्यामुळे माननिय जिल्हाधिकारी यांचे कार्यालयामध्ये दि.०२.०३.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये,अशा अल्पवयीन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश माननिय जिल्हाधिकारी यांचे कडून देण्यात आलेले आहेत,
त्यास अनुसरुन आज दिनांक ०३.०३.२०२३ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकाने धडक मोहिम सुरु केली असुन,आजरोजी एकुण २० अल्पवयीन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन १२ वाहने जप्त केली आहेत.

सदरची मोहिम सांगली शहर व सांगली जिल्ह्या मध्ये सर्वत्र राबवणार असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.तसेच आपल्या १८ वर्षा खालील मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये,१६ वर्षा खालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला तर सदर गुन्हया मध्ये दोषी आढळणाऱ्या मुलाच्या पालकांना ३ वर्षे कारावास व २५,०००/- रुपये दंडाची तरतुद,मोटार वाहन कायदा मध्ये करण्यात आली आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना, वाहन चालविल्यास चालकास ५०००/- रुपये व वाहन मालकास ५०००/- रुपये असा एकुण १०,०००/- रुपये दंड अशा शिक्षेची तरतुद मोटार वाहन कायदया मध्ये करण्यात आलेली आहे.

तरी पालकांनी व अल्पवयीन पाल्यांनी यांची गांभीर्याने दखल घ्यावी असे आवाहन,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या