अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने,सर्व स्तरातील नौकर वर्गाच्या बेमुदत संपाला पाठिंबा,

अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने,सर्व स्तरातील नौकर वर्गाच्या बेमुदत संपाला पाठिंबा,
 परभणी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य सरकारने जुनी पेन्शन बंद करून, नविन एनपीएस पेन्शन सुरु केल्याने,पालम तालुक्यातील सर्व स्तरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असता, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीनिवास इंदुरकर साहेब यांच्या आदेशानुसार, 
अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख श्री शेषराव सोपणे मामा यांनी,आज दिनांक १७ मार्च २०२३ शुक्रवार रोजी पालम तहसील कार्यालयावर सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन, अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा घोषित केला,असता संपातील कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन केले

महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर २00५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निम सरकारी सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकारी यांना नवी पेन्शन योजना NPS रद्द करून जुनी पेन्शन येजना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ व नियम १९८४ पुन्हा पूर्ववत लागू करावी या प्रमुख मागणीसाठी पालम तहसील कार्यालयासमोर दिनांक १४ मार्च २०२३ पासून करण्यात आलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या बेमुदत संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या