सुगाव बु.येथील शाळेला सफेक्स कंपनी तर्फे संगणक भेट

सुगाव बु.येथील शाळेला सफेक्स कंपनी तर्फे संगणक भेट
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- तालुक्यातील सुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे या शाळेतील विद्यार्थी हे प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन बाजी मारतात, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आत्मसात करता यावे. यासाठी सफेक्स कंपनीने CSR ऍक्टिव्हिटी अंतर्गत संगणक सेट शाळेला भेट म्हणून दिला. यामुळे आता या शाळेतील विद्यार्थ्यांचा ज्ञानात भर पडणार आहे. यावेळी सफेक्स कंपनीचे एरिया मॅनेजर श्री दिनेश राठोड ,विभाग प्रतिनिधी रमेश लाडेकर, माऊली कृषी सेवा केंद्र चे संचालक श्री निळकंठ भाऊ पुंड व शिवा भाऊ लाटकर तसेच शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, उपाध्यक्ष, व शाळेतील शिक्षक रुंध आधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या