पालम तहसील कार्यालया समोर, सर्व स्तरातील नौकर वर्गाच्या संपाचा एल्गार,

पालम तहसील कार्यालया समोर, सर्व स्तरातील नौकर वर्गाच्या संपाचा एल्गार,
नवी पेन्शन योजना NPS रद्द करा, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना जारी करा?

राज्य सरकारी बहुसंख्ये कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओसाड पडल्याने कामे खोळंबली.
पालम प्रतिनिधी अवधूत जाधव :-पालम तालुक्यातील  सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात मोठ्या संख्येने कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस पडली
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पालम तालुक्यातील बहुसंख्ये सरकारी, ,निमसरकारी,महापालिका, शिक्षक ,तलाठी ,आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक ,कृषी  विभागातील कर्मचारी  आदि सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निम सरकारी सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकारी यांना नवी पेन्शन योजना NPS रद्द करून जुनी पेन्शन येजना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व नियम 1984 पुन्हा पूर्ववत लागू करावी या प्रमुख मागणीसाठी पालम तहसील कार्यालयासमोर दिनांक 14 मार्च 2023 पासून करण्यात आलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या बेमुदत संपात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते
 या संपला प्रतिसाद मिळाल्यामुळे शासकीय कार्यालय अधिकारी कर्मचाऱ्या अभावी कार्यालय ओस पडली आहेत
 जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी यास अन्य मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचे भूमिका घेतली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या