खासदार संजय जाधव यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन.

खासदार संजय जाधव यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन.
भक्त मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन.

पालम तालुका प्रतिनिधी  :- दिनांक 3 मार्च शुक्रवार रोजी आमलकी एकादशीच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा अंतर्गत मंदिर सभामंडपाचे बांधकाम भूमिपूजन परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती अण्णा अभिमन्यू आटकळे यांची तसेच सर्व ह भ प मंडळी व मान्यवर मंडळी श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळाचे पदाधिकारी, सदस्य, शिष्य गण उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा शाखा 65 एकर समोर जलाराम बाबा मठाच्या बाजूस पंढरपूर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळाचे विश्वस्त मंडळ, बांधकाम समिती तसेच समस्त गावकरी मंडळी व भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या