पालम तालुका प्रतिनिधी :- पालम तालुक्यातील सिरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्वानिमीत्त रविवारी (ता.5) आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात सर्वच वयोगटातील 300 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. तसेच काही ग्रामस्थांना पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला.
आरोग्य शिबीराचे उदघाटन पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रकाशराव लांडे होते. व्यासपीठावर बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिरस्कर, डॉ. कोलम सिरस्कर, डॉ. मुंजाजी होरगुळे, केरवाडी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. आर.ओ. जाधव, प्रदिप खिस्ते, अधिपरीचारिका एस.आर. तम्मलवाड, समुदाय संघटक एन.ए. कडमपल्ले, पांडूरंग राठोड, जमादार राजेश्वर पाटील, पोलिस पाटील बापूराव पत्तेवार, अंगणवाडीताई सुलभा आवरगंड, मतदनीस हनवते, आशाताई मीराताई बचाटे यांच्यासह आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमीत्त डिजेच्या खर्चाला फाटा देवून आरोग्य शिबीर घेतल्यामुळे श्री. काकडे यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. सिरपूरवासियांनी असा सामाजिक उपक्रम घेवून ख-या अर्थाने सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. हा उद्धेश जयंती साजरी करण्यामागे ठेवला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणि लोककल्याणासाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला. त्यांचे विचार अंगीकारून तरूणांनी व्यसनापासून दूर राहून प्रगतीकडे वाटचाल करावी, असे अहवान श्री. काकडे यांनी केले. शिबिरात 0 ते 5 वयोगातील 120 बालकांची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय 130 दंतरूग्णांची तर अन्य 150 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. शिबीराचे सूत्रसंचालन मारोती लांडे तर प्रास्ताविक भास्कर लांडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच राहूल आवरगंड, उपसरपंच सदाशिव लांडे, अजय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर हनवते, विठ्ठल कदम, बालाजी दुधाटे, कृष्णा बचाटे, नागनाथ कदम, विष्णू आवरगंड, बालाजी बीडकर, भागवत आवरगंड, सिद्धार्थ गायकवाड, लक्ष्मण दुधाटे, यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
फोटोओळी ः पालम तालुक्यातील सिरपूर येथे शिवजयंतीनिमीत्त आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिरस्कर, डॉ. कोलम सिरस्कर, डॉ. मुंजाजी होरगुळे, डॉ. आर.ओ. जाधव, परीचारिका एस.आर. तम्मलवाड, एन.ए. कडमपल्ले, सरपंच राहूल आवरगंड, सदाशिव लांडे, सुधाकर हनवते, बालाजी दुधाटे यांच्यासह आदी.

0 टिप्पण्या