पालम तालुक्यातील मौजे सिरपूर येथे पशुसंवर्धन शिबिर संपन्न, यावेळी केले 200 जनावरांचे लसीकरण.
पालम तालुका प्रतिनिधी :- तपोधन ऑग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने सिरपूर ता.पालम येथे दिनांक १० शुक्रवारी पशुसंवर्धन शिबिरासह 200 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यात शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले असून पशुपालकांच्या समस्यांचे निराकारण करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस पाटील पंडितराव लांडे होते. प्रमुख पाहूण्या म्हणून पशुधन अधिकारी डॉ. शिवाली पाटील, डॉ. अनिल डांगे, डॉ. पालमकर, परिचर अन्नरवाड, अमूल कंपनीचे विक्री अधिकारी अमित भोसले, उपसरपंच सदाशिव लांडे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर हनवते, बालासाहेब बीडकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. डांगे यांनी पशुंचे आहार व आरोग्यबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तदनंतर डॉ. पाटील यांनी जनावरांच्या लसिकरणाचे महत्व विशद केले. शिवाय, अमित भोसले यांनी जनावरांच्या आहाराविषय़ी मार्गदर्शन केले. तदनंतर गावातील 200 जनावरांचे लसिकरण करण्यात आले. शिबिराचे सूत्रसंचालन भास्कर लांडे तर आभार पशुपती शेवटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तपोधन कंपनीचे संचालक ज्ञानराज दुधाटे, नामदेव शिंदे, माणिक कदम, दिलीप शेवटे, नागनाथ लांडे, शंकर कदम, दत्तराव आवरगंड, अजय देशमुख, लक्ष्मण दुधाटे, वैजनाथ लांडे, दिपक आवरगंड, धिरज आवरगंड, प्रकाश लांडे, नागनाथ कदम, विष्णू आवरगंड, दिपक दुधाटे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या