आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघ तर्फे इलेक्ट्रो होमिओ पॅथीचे पाचवे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 25 व 26 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संपन्न झाले त्यात परभणीतील डॉ.गोविंद कामटे यांना इलेक्ट्रोपॅथी मध्ये विशेष कार्य केल्याबद्दल 2023 चा गौरव इलेक्ट्रो होमिओपॅथी स्पाजरीक चिकित्सक वेल्फेअर असोसिएशन नांदेड वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल परभणी येथील प्रसिद्ध बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र चे मुख्य संचालक डॉ.गोविंद कामटे यांचा वीर वारकरी सेवा संघ परभणीच्या वतीने त्यांच्या केंद्रात मध्ये पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे आयोजक वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी यांच्यावतीने 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आला बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी येथे सत्कार करण्यात आला अशी माहिती नितीन जाधव गोगलगावकर यांनी दिली

0 टिप्पण्या