परभणी जिल्हा प्रतिनिधी :- मराठा सेवा मंडळ परभणी शाखेच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा च्या निमित्ताने व्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये,परभणी येथील रांगोळी कलाकार युवती वैष्णवी पांचाळ मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माजलगाव या ठिकाणी रांगोळी त्याचबरोबर परभणी येथे अनेक ठिकाणी रांगोळी काढून चांगला संदेश दिला
तसेच इतर सप्त्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या बद्दलही रांगोळी उत्कृष्ट काढल्याबद्दल पांचाळ यांचा शिवछत्रपती रांगोळी सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक मराठा सेवा मंडळाचे गोविंद इक्कर पाटील, या कार्यक्रमासाठी उद्घाटक डॉ विवेक नावंदर, प्रमुखपाहुणे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, ह भ प बालासाहेब महाराज मोहिते पाटील, मराठा सेवा मंडळाचे नितीन देशमुख, प्राणी मित्र नितीन जाधव गोगलगावकर, नगरसेवक सुनील देशमुख, शिवव्याख्याते विशाल देशमुख, बाल व्याख्याते आरोही खंडारे पाटील, उपसरपंच मंगेश भरकड यांच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला भजन गल्ली सुभाषराव परभणी 26 फेब्रुवारी रोजी अशी माहिती जयंती महोत्सव समिती मार्गदर्शक तथा मराठा सेवा मंडळ प्रदेश प्रवक्ते लोकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर पत्रकार द्वारे माहिती दिली

0 टिप्पण्या