महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप  
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण, प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज 
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- माधवराव पाटील महाविद्यालय पालम येथील शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. यात प्रामुख्याने त्यांच्या मागण्या १)सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेतील रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पुर्ववत करने, २) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०,२०,३० वर्षा नंतर च्या लाभाची योजना लागू करावी, ३) सातव्या वेतन आयोगानुसार वंचित असलेल्या १४१०विद्यापिठीय शिक्षकेतर कर्मचार्यांना थकबाकी सह सातवा वेतन आयोग लागू करावा ४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्याची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देने ५) २००५ नंतर सेवा रुजु झालेल्या कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू करने ६) विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करने, या मागण्यासाठी बेमुदत संपावर एकुण अकरा म्हणजेच १०० टक्के महाविद्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत यात    १)सि एम लोखंडे , २) बी व्ही गायकवाड ३ )आर एस लांडगे ४) व्ही आर वाघमारे ५ )एम सी पठाण ६ )एस के चाळक  ७ ) आर एन सय्यद ८)एन जी साबळे ९)एस यु गायकवाड १० )एम यु मोरताटे ११)ए आर दुधाटे यांचा समावेश आहे.. त्यांच्या या संपाला  स्वामुक्टा या प्राध्यापक संघटनेने सुध्दा पाठिंबा दिला आहे.  अचानक संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सध्या सर्व निकाल लागले असून विद्यार्थ्यांना आपल्या त्रुटी पुर्तता करावयाचे आहेत त्यामुळे महाविद्यालयाचे काम बंद असल्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे ही संबंधित प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे असे विद्यार्थ्यांनकडून मत व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या