नळी-वडगाव विकास सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध.

नळी-वडगाव विकास सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध.

भूम तालुका प्रतिनिधी :- भूम-तालुक्यातील नळी वडगाव येथील विकास सोसायटी ची निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल यांच्या नेतृत्वात बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून नंदू खारगे व सय्यद यांनी काम पाहिले. या विकास सोसायटीच्या चेअरमन पदी अश्रू भानुदास भोजने तर व्हाईस चेअरमन पदी आजिनाथ वामन हजारे यांची बिनविरोध निवड झाली.बिनविरोध झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन चा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रवीण रणबागुल मराठवाडा उपाध्यक्ष यांनी केला. यावेळी माजी सरपंच रामदास पाटील, माऊली राऊत, बापू समिंदर , नवनाथ महानवर, अनिल औटी, बबन जवादे, वसंत हराळ, भास्कर हळनोर गणेश इनामदार, भीमा जिटे,संपत समिंदर याप्रसंगी नळी- वडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या