अंजनवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, जुगार पट्टू गजाआड.

 अंजनवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड, जुगार पट्टू गजाआड.



पालम  तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :-

  पालम पोलीसांच्या पथकाने अंजनवाडी शिवारात जुगार खेळत असताना धाड टाकली दिनांक 25 फेब्रुवारी रोजी धाड,         

यामध्ये सविस्तर वृत असे की अजांनवाडी शिवारात मंचक वाघमारे यांच्या शेतीमध्ये काही लोक  अनेक दिवसापासून जुगार खेळत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी पथकाच्या माध्यमातून सर्व जुगार जुगार खेळणाऱ्यांना धाड टाकून ताब्यात घेतले

 या धाडीमध्ये २१४० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या ठिकाणी जुगार खेळताना रामराव नागठाणे, सूर्यकांत पळसकर, बाबू कवडे ,बालाजी हनवते, अशोक स्वामी हे पत्त्याचा जुगार खेळताना आढळून आले त्यांच्यावर 12 अ प्रमाणे पालम पोलिसात गुन्हा दाखल केला असून सदरील घटनेची फिर्याद शिवाजी गोरे यांनी दिली आहे पुढील तपास अमलदार देशमाने करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या