गंगाखेड प्रतिनिधी :- जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मरडसगाव येथे, दिनांक28 फेब्रुवारी 2023 रोजी,शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी प्रथम ज्ञानज्योती,विद्येची देवता सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन करून, कार्यक्रमाला सुरुवात केली.
केंद्रीय शिक्षण परीषद मरडसगाव येथील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मरडसगाव केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय नारायण आरसले साहेब हे होते,
यावेळी मान्यवरांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला,
नंतर वरिष्ठांनी शैक्षणिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मरडसगाव जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक माननीय कदम सर,शाळा समितीने अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व शिक्षक वृंद, केंद्रतील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक,ग्रामपंचायत मरडसगाव येथिल सदस्य भारत बडवणे,संजय काळे, यशवंत काळे,नितिन कांबळे इत्यादी मानेवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या