सिटीस्कॅन मशीन बंद बाबत यशवंत पवार यांची आरोग्यमंत्र्याकडे तक्रार.

 सिटीस्कॅन मशीन बंद बाबत यशवंत पवार यांची आरोग्यमंत्र्याकडे तक्रार.

सोलापूर प्रतिनिधी ;- सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे शासकीय रुग्णालय असून या रुग्णालयात सोलापूर शहर जिल्ह्यासह शेजारील असलेल्या कर्नाटक राज्यातील अनेक रुग्ण उपचारा करता येत असतात सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वेगवेगळ्या आजारावर उपचार केले जातात याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असून सोलापूर शहरात काही मोजक्याच हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीनची उपलब्धता आहे सदरच्या मशीनच्या तपासणी बाबत मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयात खर्च येत असून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सिटीस्कॅन मशिन नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत बाहेरील खाजगी हॉस्पिटल मधून सिटीस्कॅन करून द्यावे लागत असल्याने सर्वसामान्य माणसाला हा खर्च परवडत नसल्याने अनेक गोरगरीब लोकांची आर्थिक हेळसांड होत  असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेली सिटीस्कॅन मशीन वारंवार नादुरुस्त होत असून त्या मशीनचे बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे तरी माननीय आरोग्य मंत्री यांनी याबाबत जातीने लक्ष घालून सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे सिटीस्कॅन मशीन तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या