शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उद्यमशील व्हावे - कृष्णा भोसले अध्यक्ष शुभाअशीष अग्रो प्रोडूसर कंपनी पेठपिपंळगाव
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- अलिकडील काळात शेती व्यवसायात अनेक संकटे येत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या बौध्दिक क्षमथिचा वापर करून सामुहिकरित्या एकत्र येत शेती हा उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांनी उद्यमशील बनले पाहिजे" असे प्रतिपादन बी.आ. ढगे पाटील ॲग्रो प्रोड्युसर कंपनी , चाटोरीच्या सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना उद्योगशील शेतकरी कृष्णा भोसले यांनी केले.
चाटोरी ता. पालम येथील बी.आर.ढगे पाटील ॲग्रो प्रोड्युसर कं.लि. ची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तातेराव किरडे तर प्रमुख मार्गदर्शक कृष्णा भोसले , आत्माचे तालुका अधिकारी श्री प्रकाश सोळंके, कृषीसाहय्यक श्री वसत राठोड हे होते . प्रसंगी संचालक संतोष पैके , गंगाधर पैके , तातेराव किरडे , नरहरी किरडे , शिवा गयाळ ,...आदी उपस्थित होते.
यावेळी कंपनीचे अनेक सभासद उपस्थित होते. कंपनीच्या कार्याचा अहवाल वाचान अध्यक्ष दत्ता ढगे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणांची व योजनांची माहिती आत्माचे तालुका अधिकारी श्री प्रकाश सोळंके यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता ढगे यानी केले तर आभार संतोष पैके यांनी मानले.




0 टिप्पण्या