परभणी येथे समन्वय विमुक्त व भटक्यां विमुक्त समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- सरदेशपांडे हुरडा पार्टी रेणुका मंगल कार्यालय समोर परभणी येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित भटक्या विमुक्त व आदिवासी समन्वय समितीचे प्रमुख मा.किशन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व मा.अनिल जाधव,मा.विष्णू जाधव , ऍड अरुण जाधव, डॉ धर्मराज चव्हाण यांच्या उपस्थित, दि.१२/०२/२०२३ वार रविवार रोजी दुपारी ठीक ११:०० वा
पक्षाची बांधणी व भटक्या च्या प्रश्नाच्या संदर्भाने, वंचित बहुजन आघाडी परभणी च्या वतीने विमुक्त व भटक्याचा मेळावा घेण्यात येणार आहे तरी,परभणी,पाथरी,गंगाखेड,जिंतूर,पूर्णा,पालम,मानवत,सेलू,सोनपेठ तालुका अध्यक्ष,तालुका महासचिव, शहर अध्यक्ष,शहर महासचिव.ही सर्व तालुकाध्यक्षानी व शहर अध्यक्षाणी जास्तीत जास्त संख्येने विमुक्त व भटक्यांना घेऊन मेळाव्यात सामील व्हावे.असे टी डी रुमाले परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष वं.ब.आ,सचिन गंगाखेडकर परभणी जिल्हा अध्यक्ष उत्तर,सुनीता साळवे महिला जिल्हा अध्यक्षा,निवृत्ती सोडगिर परभणी जिल्हा महासचिव वं.ब.आ,अमोल ढाकणे परभणी जिल्हा महासचिव, भगवान दराडे परभणी जिल्हा महासचिव उत्तर,सर्जेराव पंडित परभणी जिल्हा महासचिव उत्तर, यांनी आव्हान केले आहे.

0 टिप्पण्या