श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय व डिस्कवरी सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिन उत्साहात साजरा,

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय व डिस्कवरी सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिन उत्साहात साजरा,
पालम तालुका प्रतिनिधी :- राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमी केरवाडी संचलित श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी या शाळेत आज विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील वेगवेगळ्या कल्पना प्रयोगाच्या स्वरूपात स्वतः तयार करून त्याचे प्रदर्शन केले. तसेच शाळेतील विद्यार्थी , प्रतिशा देवणीकर, मुक्ता केरवाडीकर, प्रिया जाधव समीक्षा अष्टूरकर,जानवी डीगे आनंदी  कराळे समीक्षा पौळ, या विद्यार्थ्यांनी भारतीय वैज्ञानिका विषयी माहिती सांगितली.शाळेतील  विद्यार्थ्यांनी खूप सुंदर - सुंदर प्रयोग तयार केले होते. 
या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी , विज्ञानातील गमती- जमती , वैज्ञानिक नाटिका, गणितातील गमती जमती तसेच  गुरुत्वाकर्षण, बल, बलाचे प्रकार , पाण्याची घनता ,हवेचा दाब, सौरमंडळ, सोलार ऊर्जा , अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग,  आंतरिंदिये,   रक्ताभिसरण,   पचन संस्था ,श्वसन संस्था, गणितातील गमती जमती, अंधश्रद्धा निर्मूलनावर  आधारीत विद्यार्थ्यांनी विज्ञान  गित सादर केले. 
डिस्कवरी सायन्स सेंटर तर्फे विष्णू जाधव सर , विरभद्र सर यांनी विज्ञान प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीसांचे लगेच वाटप केले. तालुक्यातील अनेक शाळांनी या विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्या. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक  विज्ञानविषयक संकल्पना स्पष्ट झाल्या.
शाळेतील सर्व पालक वर्ग या विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञानाच्या वेगवेगळ्या गमती जमती समजून घेतल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक जाधव सर यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पौळ सर यांनी केले.  

या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहूणे म्हणून स्वप्नभूमी संस्थेचे श्री आशिष कुलकर्णी सर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री सारंग सर श्री प्रल्हाद पांचाळ  सर सौ गंगाताई माने , राम लटपटे ,बबन  धुळगुंडे, इत्यादी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक सुरेखा चामले, उषा किरडे,  मनोज गडमवाड, संगीता पौळ, विद्या बडोले, पंकज कुलकर्णी ,  उर्मिला लोखंडे,संदीप गडगिळे, लता गडगिळे , तुकाराम पांचाळ आणी विष्णू पांचाळ आदींनी यशस्वीरित्या परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या