साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत प्रेरक प्रेरिका यांच्यावर उपासमारीची वेळ धकीत मानधन ताल्काळ देण्यात यावे साक्षर भारत संघटना तालुका अध्यक्ष अवधूत जाधव यांची मागणी

साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत प्रेरक प्रेरिका यांच्यावर उपासमारीची वेळ धकीत मानधन ताल्काळ देण्यात यावे साक्षर भारत संघटना तालुका अध्यक्ष अवधूत जाधव यांची मागणी
 
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :-
ग्रामपंचायत मधील साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत चालविल्या जाणाऱ्या लोकशिक्षण केंद्रात कुशल नेतृत्व देऊ शकाल या उद्देशाने ग्रामपंचायत मध्ये असलेल्या लोकशिक्षण केंद्रावर प्रेरक प्रेरिका यांची 2012 पासून नियुक्ती करण्यात आलेली होती
 व या प्रेरक प्रेरिका यांना दोन हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे मानधन देण्यात येत होते यांना जवळपास 33 महिन्याचे असे मिळून एकूण 66000 हजार रुपये एवढे मानधन मिळाले 
त्यानंतर त्यांना कसल्याही प्रकारचे मानधन मिळालेले नाही जवळपास त्यांनी सात वर्ष ग्राम लोक शिक्षण समितीच्या सहाय्याने गावातील प्रौढ शिक्षण केंद्रावर निरक्षरांना साक्षर करण्याचे काम अतिशय कसोटीने केले
 जिल्हा साक्षरता समितीकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी निरक्षर लोकांची परीक्षा घेऊन या परीक्षेची कारवाई चांगल्या पद्धतीने पार पाडली पण त्या कामाचा त्यांना मोबदला अद्यापही मिळालेला नाही 
त्यामुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याकडे शासनाने तात्काळ लक्ष घालून प्रेरक प्रेरिका यांची मानधन तत्काल वाटप करण्यात यावे अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या