जिंतूर तालुका प्रतिनिधी :- मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तालुका प्रेस क्लब व व्हॉईस ऑफ मिडीया जिंतूर च्या वतीने साजरी करण्यात आली.
आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारी रोजी असते असे म्हणत नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित केले होते. अखेर मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे मुख्यविश्वस्त एसएम देशमुख यांनी यावर माहितची देत 20 फेब्रुवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासनाने निश्चित केल्याचे स्पष्ट केले.
यावेळी मराठी पत्रकारीतेचे आद्य प्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मिडीयाचे मराठवाडा विभागिय अध्यक्ष तथा प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विजय चोरडीया, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचकराव देशमुख,व्हॉईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण,प्रेस क्लबचे उपाध्यक्ष गुलाबराव शिंदे,नितीन रोकडे,महेश देशमुख राहूल वाव्हुळे,सचिन रायपत्रीवार ,माबुद खान,संदिप माहुरकर,राम रेघाटे,सचिन इंझे, राजाभाऊ काळे आदिंची उपस्थीती होती...

0 टिप्पण्या