महाराजांचे बॅच बिल्ला वाटप करून जयंती साजरी

महाराजांचे बॅच  बिल्ला वाटप करून जयंती साजरी 
गंगाखेड तालुका प्रतिनिधी :- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त,सर्व जेसीबी चालकांना महाराजांचे बॅच बिल्ले वाटप करण्यात आले,

जेसीबी पॉईंट गंगाखेड परळी नाका येथे, जेसीबी चालक संघटनेच्या वतीने,१९ फेब्रुवारी रोजी शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष,महाराष्ट्र जेसीबी चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष,जेसीबी चालक धुराजी मांजरे दगडवाडीकर यांच्या उपस्थितीमध्ये जेसीबी चालकांचा सत्कार करून,परभणी जिल्ह्यातील व शहरातील सर्व जेसीबी चालकांना,महाराजांचे बॅच बिल्ले देण्यात आले,

 यावेळी ज्येष्ठ जेसीबी चालक प्रभाकर राव काळे,जेसीबी चालक धुराजी मांजरे,राहुल सोनवणे,अंकुश देवकते, रफिक शेख,गजानन सुतारे,जेसीबी चालक इम्रान सय्यद,लक्ष्मण सुतारे, सय्यद सोनू,राष्ट्रजन जेसीबी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, आयोजक वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,धार्मिक सेवक, नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्या वतीने,सर्व जेसीबी चालकांना बॅच बिल्ले वाटप करण्यात आले, शेवटी,छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊन संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या