शहरातील मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी,हौद बांधावे - नितीन जाधव गोगलगावकर

 शहरातील मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी,हौद बांधावे - नितीन जाधव गोगलगावकर



परभणी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील, प्राणी व जनावरांसाठी उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याचे हौद जिल्ह्यात जागोजागी हौद बांधून,मुक्या प्राण्यांना पाण्याची सोय करावी, असे निवेदन,प्राणीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी, जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत,केंद्राचे कृषिमंत्री साहेब भारत सरकार ,राज्याचे कृषिमंत्री साहेब महाराष्ट्र सरकार यांना सादर केले आहे.

उन्हाळा सुरू होत असल्याने  प्रशासनाने प्राण्यांना व जनावरांसाठी प्रत्येक चौकात हौद बांधून पाण्याची सोय करावी, महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यामध्ये लहान मोठे प्राणी व जनावरे शहरामध्ये व जिल्ह्यात आहेत, प्रशासनाने त्यांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था प्रत्येक चौकात किंवा मंदिर परिसरामध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, शासनाने लवकर जनावराच्या पाण्याच्या सोयीसाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सरकारने विचार करून महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य आहे आणि परभणी जिल्हा हा कृषी विभागाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून प्रशासनाने लवकर प्रत्येक चौकात चौकामध्ये पशुपक्षी प्राणी जनावर  प्राणीसंवर्धन  त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करून जिल्ह्यात न्याय द्यावा अशी नम्र विनंती,प्राणीसेवक नितीन जाधव गोगलगावकर प्राणी- गोमाता संरक्षण  जागृतीअभियान परभणी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या